आला चड्डी चोर! महिलांचे अंडरवेअर असतात निशाण्यावर

आतापर्यंत आपण पैसे, सोने अशा अनेक गोष्टी चोरणाऱ्या चोरांबद्दल एकले होते, मात्र भोपाळमध्ये चक्क महिलांचे अंडरवेअर चोरणारा चोर भोपाळमध्ये सक्रिय झाला आहे. पोलिस या अंडरवेअर चोरट्याचा तपास करत आहेत.

भोपाळमध्ये एक अशी घटना समोर आली आहे, की ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. भोपाळमधील अंडरवेअर चोरट्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चोर घराचा दरवाजा कसा उघडतो आणि वाळत घातलेल्या कपड्यांवर हात पुसताना दिसत आहे. यानंतर तो कपडे उचलतो आणि खिशात आणि स्वेटरमध्ये ठेवताना दिसत आहे. स्कूटरवरून आलेल्या या चोरट्याने हेल्मेट घातले होते. कपडे चोरल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला आहे. चोरी करणारी व्यक्ती फक्त महिलांचे अंतर्वस्त्र चोरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून महिला सतर्क झाल्या आहेत. या घटनेनंतर आता महिलांनी सुकण्यासाठी ठेवलेले कपडे घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे. या चोरट्यापासून वाचण्यासाठी वसाहतीतील लोक आता जागरूक झाले आहेत. त्या चोरट्याचाही पोलिस तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगाराला पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.