एक तरुणी आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर गेली होती. या तरुणीला तिथेच झोप लागली आणि रुळावर ती झोपून गेली. ट्रेनच्या ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारले आणि तरुणीचा प्राण वाचवले. बिहारमध्ये ही विचित्र घटना घडली आगे.
बिहारमधल्या मोतिहारीतील चकिया स्टेशनजवळ एक तरुणी आत्महत्या करण्यासाठी पोहोचली. रुळावर ती झोपली आणि गाडीची वाट बघत राहिली. गाडीची वाट बघताना तिला गाढ झोप लागली. तिथून रुळावर एक गाडी आली पण गाडीच्या चालकाने या तरुणीला पाहिले आणि अर्जंट ब्रेक मारला. ब्रेक मारल्यानंतरही तरुणीच्या अगदी जवळ नाट्यमय पद्धतीने गाडी थांबली. मग चालक खाली उतरला आणि त्याने तरुणीला उठवलं. यासाठी स्थानिकांची मदत घेतली. पण तरुणी हटायला तयार नव्हती. मला मरायचंच आहे असं ही तरुणी म्हणत होती. तरी नागरिकांना तिला रुळावरून हटवलं आणि तिला सुखरुप घरी पोहोचवलं.
A girl reached Motihari’s Chakia railway station to commit su!cide and fell asleep on the railway track while waiting for the train, Train Driver saved the girl’s life by applying emergency brakes, Bihar
pic.twitter.com/Jrg1VqjG2s— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 10, 2024