पॅरिसमध्ये हुकूमशाहीविरोधात महिलांचे अर्धनग्न आंदोलन, रस्त्यावर उतरून केला निषेध

फ्रान्सची राजधानी पॅरिस सध्या चर्चेत आले आहे ते तेथील अनोख्या आंदोलनामुळे. पॅरिसमधील महिलांसह मुलींनी चक्क हुकूमशाहीविरोधात बंड पुकारले आहे. येथील महिला  टॉपलेस आणि अर्थनग्न होऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी स्वातंत्र्य आणि हुकूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरत निदर्शन केले आहे.

पॅरिस येथील आयफीएल टॉवर येथे देशाच्या हुकूमशाही विरोधात मोठ्या संख्येने महिला अर्थनग्न अवस्थेत रस्त्यावर उतरल्या आहेत. स्त्रिया आणि मुली स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आणि हुकूमशाही विरोधात रस्तावर उतरले आहेत. याचा निषेध म्हणून या स्त्रियांनी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर झाडलोट केली आहे. रस्त्यावर उतरुन त्यांनी हुकूमशाहीविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेद नोंदवला आहे. हे आंदोलन 29 जून रोजी पॅरिस येथील आयफिएल टॉवर येथे केले होते. या घटनेचा सध्या व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.