
गुगल मॅप्सचा वापर करून परीक्षा केंद्रावर जात असलेल्या एका महिलेचे शिक्षक होण्याचे स्वप्न तूर्तास लांबले आहे. राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (रीट) जात असलेल्या सपना या महिलेस गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे परीक्षेला मुकावे लागले. ती अलवर येथील बाबू शोभाराम कला महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उशिरा पोहोचल्यामुळे तिला आत प्रवेश मिळाला नाही. तेव्हा ढसाढसा रडू लागली.