एकाच महिलेने केले दोघांशी लग्न, बायको मिळवण्यासाठी दोन्ही पती पोलिस स्थानकात

एका महिलेने दोन महिन्यांच्या अंतरात दोन पुरुषांशी लग्न केले आहे. आता आपल्या पत्नीला मिळवण्यासाठी दोन्ही पुरुष पोलिस स्थानकात पोहोचले आहेत.

मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये ही विचित्र घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेचे तिच्या प्रियकराशी लग्न झाले होते. पण लग्नाच्या दोन महिन्यानंतर ही महिला बेपत्ता झाली. पत्नी बेपत्ता झाल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा कळाले की या महिलेने दुसऱ्या एका माणसाशी लग्न केले आहे.

त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्थानकात पोहोचले. ही महिला पहिल्या पतीसोबत 8 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर या दोघांनी लग्न केलं होतं. दोन महिन्यानंतर माहेरी जाते म्हणून ही महिला घराबाहेर पडली आणि परत आलीच नाही. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर कळाले की तिने दुसऱ्या पुरुषासोबत कोर्ट मॅरेज केले आहे.

पोलिसांनी महिलेशी विचारणा केल्यानंतर तिने दुसऱ्या पतीसोबत रहायचे असल्याचे सांगितले. तसेच पहिल्या पतीला घटस्फोट देण्याचेही सांगितले. महिलेचा पहिला पती पत्नीविरोधात तक्रार करू शकतो असे पोलिसांनी म्हटले आहे. पण सध्या तरी या प्रकरणाच पुढील चौकशी सुरू आहे.