शेअर मार्केटमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी तोटा

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये वुमेन ट्रेडर्सची संख्या लक्षणीय आहे. नुसती संख्याच नव्हे तर शेअर बाजारात पुरुषांच्या तुलनेत महिला अत्यंत हुशारीने गुंतवणूक करताना दिसत आहेत. यासंदर्भातील सेबीचा रिपोर्ट चर्चेत आहे. या रिपोर्टनुसार, फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडींगमध्ये महिलांचा सहभाग वाढलाय. त्यांची कामगिरीही पुरुषांच्या तुलनेत जास्त चांगली आहे. अत्यंत विचारपूर्वक गुंतवणूक केल्याने महिला ट्रेडर्सचे नुकसानही कमी झालेले दिसून येतंय.

सेबीच्या अहवालानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात 91.9 टक्के पुरुषांचे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडींगमध्ये नुकसान झालेय. तर 86.3 टक्के महिलांचे नुकसान झाले. म्हणजेच फक्त 8.1 टक्के पुरुष ट्रेडर्सनी नफा कमवला, तर 14 टक्के महिला नफा कमवण्यात यशस्वी झाल्या. महिला ट्रेडर्सचे सरासरी 75 हजार 973 रुपयांचे नुकसान झाले. पुरुष ट्रेडर्सचे सरासरी नुकसान 88, 804 रुपये इतके आहे. सेबीच्या अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी तोटा झाला आहे.