नवजात अर्भकाला सोडून महिलेने पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
शनिवारी सकाळी चौकी मोहल्ला, सुलेमान पोलीस चौकीच्या मागील बाजूस स्त्री जातीचे नवजात अर्भक रडत असल्याचे एका दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती जे.जे. मार्ग पोलिसांना दिली. काहीच वेळात जे.जे. मार्ग पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या अर्भकाला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले आहे. अज्ञात महिलेने त्या अर्भकाला मृत्यू घडवून आणायच्या उद्देशाने उघड्यावर सोडून पळ काढला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.