उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे खराब बुंदीचे लाडू खाल्ल्याने एका महिला न्यायाधीशाची तब्येत बिघडली. या न्यायाधीशांची तब्येत इतकी खालावली की आठवडाभर रूग्णालयात दाखल करण्याची पाळी आली. जवळपास आठवडाभर त्या रूग्णालयात दाखल होत्या. याप्रकरणी लाडू विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर प्रकरण लखनऊच्या गोमती नगरमधील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाचे आहे. या दुकानाविरोधात जिल्हा न्यायाधीशांनी एफआयआर दाखल केला आहे. मंजुळा सरकार असे महिला न्यायाधीशांचे नाव आहे. बुंदी खराब झालेले लाडू खाल्ल्याने त्या आजारी पडल्या होत्या, त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते.
महिला न्यायाधीशांसोबतच त्यांची बहीण मधुलिका आणि मदतनीस अनिता यांचीही प्रकृती खालावल्याने न्यायाधीशांनी दुकानदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.