
यशश्री शिंदे हत्याप्रकरणी उरणमधील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. संतप्त महिलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा भाजप आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयमोर आल्यावर जोरदार घोषणा देण्यात आल्या. मात्र, बालदी यांनी मोर्चाकजे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त महिलांनी बालदी यांच्या कार्यलयावर बांगड्या फेकत निषेध व्यक्त केला. तसेच महेश बालदी बाहेर या, अशा जोरदार घोषणा दिल्या.
उरण मधील यशश्री शिंदे या तरुणीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून त्याने ते झुडपात फेकले. या घटनेनंतर उरणमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उरणकरांचा मोर्चा निघाला. या प्रकरणातील नराधमाला अटक करून त्याला तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली. हा मोर्चा भाजप आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयासमोर आला. मात्र बालदी यांनी या मोर्चाकडे सपशेल दुर्लक्ष केले.
बालदी यांनी दुर्लक्ष केल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. संतप्त महिलांनी ‘बाहेर या, बाहेर या, महेश बालदी बाहेर या’ अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतरही बालदी मोर्चाला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे संतप्त मोर्चेकरी महिलांनी त्यांच्या कार्यालयावर बांगड्या फेकल्या. बालदी यांच्या कार्यलयावर बांगड्या फेकत महिलांनी निषेध व्यक्त केला.