
पतीच्या छळाला कंटाळून मायलेकीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नीता देवराईकर यांच्या तक्रारीनुसार जावई आशिष दुवा याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पनवेल पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आशिषचे अन्य स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे तो मैथिलीला बेदम मारहाण करायचा. मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून मैथिलीने लेकीसह आत्महत्या केल्याची माहिती नीता यांनी दिली.
पळस्पे फाटा येथील औरा इमारतीत आशिष दुवा पत्नी आणि मुलीसह राहत होते. दोन दिवसांपूर्वी आशिषची पत्नी मैथिलीने आठ वर्षीय मुलगी मायरा हिला २९ व्या मजल्यावरून खाली फेकले आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली. पनवेल शहर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन मैथिली विरोधात गुन्हा दाखल केला होता