राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्यानुसार महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. पण आता काही महिलांसाठी ही योजना बंद होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महिला व बालकल्याण विभागाकडे लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रार आल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच बाबी तपासल्या जातीत त्यात कुठल्याही महिलेटे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असेल, दुचाकी आणि चारचाकी असेल, आंतराज्य विवाह, सरकारी नोकरी लागली असेल आणि आधार आणि बँकेच्या नावात तफावत असेल तर त्या लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरतील अशी माहिती तटकरे यांनी दिली.