
भर उन्हात तसेच कोसळणाऱ्या मुसळधार पावसात वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत असतात. आता चंद्रपूरात एका महिला वाहतूक पोलिसांनी सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. या महिला वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याने रक्तदान करत एका 15 दिवसांच्या बाळाचे प्राण वाचवले आहेत.
चंद्रपूरमधील एका 15 दिवसांच्या मुलीला तातडीने रक्ताची गरज होती. वाहतूक शाखेतील मगिला पोलीस शिपाई पल्लवी सदनवार या महिला कर्मचारीऱ्याने प्रसंगावधान राखत तातडीने रक्तदान केले. त्यामुळे त्या 15 दिवसांच्या बाळाचे प्राण वाचले आहेत. प्रवाशाच्या प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कोणत्याही वातावरणात सावी बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनी सामाजिक बांधिलकीही दाखवून दिली आहे. त्यांच्या रक्तदानामुळे एका बाळाचे प्राण वाचले आहे. यासाठी या महिला कर्मचारी सदनवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.