
एका पर्यटकाने ‘रेडिट’ या सोशल मीडिया साइटवर त्याला गोव्यात आलेला वाईट अनुभव शेअर केला. तसेच पुन्हा कधीही गोव्याला येणार नसल्याचे सांगितले. पर्यटकाने आपल्या पोस्टमधून अनेक गंभीर दावे केले आहेत. त्याला शिवीगाळ, मारहाण आणि स्थानिकांचा त्रास सहन करावा लागल्याचे त्याने सांगितले. या पर्यटकाच्या भयावह अनुभवावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. ‘मी खूप निराश झालो आहे. मला माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून गोवा आवडतो. मी दर दोन वर्षांनी एकदा गोव्याला जातो. मी गोव्याबद्दल जे काही ऐकत आहे त्यावरून, मला वाटत नाही की मी आता पुन्हा गोव्याला जाईन,’ असे पर्यटकाने लिहिलंय.