
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे एका मुस्लिम तरुणीचा हिजाब जबरदस्ती उतरवण्यात आला आणि तिच्यासोबत असलेल्या एका हिंदू तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनीही याची दखल घेत सहा जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ मुझफ्फरनगरमधील खालापूर परिसरातील आहे. येथे कर्जाचा हप्ता घेण्यासाठी जात असलेल्या 20 वर्षीय फरहीन आणि सचिन नावाच्या एका तरुणाला हा प्रकार घडला आहे. फरहीन हिची आई फरहाना उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेमध्ये कर्मचारी असून तिच्याच सांगण्यावरून फरहीन सचिनसोबत कर्जाचा हप्ता घेण्यासाठी दुचाकीवरून जात होती.
याचवेळी 8-10 जणांच्या मुस्लिम टोळक्यांना त्यांनी रोखले आणि फरहीनचा हिजाब जबरदस्ती उतरवा. एवढेच नाही तर तिच्यासोबत असलेल्या सचिनसोबतही गैरवर्तन केले. हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित एकाने आपल्या फोनवर रेकॉर्ड केला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. प्रकरण तापल्याने पोलिसांनीही याची दखल घेतली. पोलिसांनी फरहीनच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
ही घटना 12 एप्रिल रोजी सायंकाळी चार ते साडेचार दरम्यान भवन परिसरात घडली. दोघेही उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेकडून कर्जाचा हप्ता घेण्यासाठी आले होते. याचवेळई दरझी वाली गल्ली येथील काही स्थानिकांनी त्यांना थांबवले आणि गरवर्तन करत त्यांना मारहाण केली, असे मुझफ्फरपूरचे सीओ राजू कुमार साओ यांनी सांगितले.
Disrobing a young Muslim woman and swarming around her like a pack of hyenas. Disgusting, shameful visuals from Uttar Pradesh’s Muzaffarnagar.
— Rohini Singh (@rohini_sgh) April 14, 2025
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. व्हिडीओच्या माध्यमातून आणखी आरोपींची ओळख पटवून त्यांनाही अटक करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही राजू कुमार साओ यांनी सांगितले.