पश्मिच बंगालच्या हावडा जिह्यात एका महिलेने नवऱ्याची किडनी 10 लाख रुपयांना विकली आणि प्रियकरासोबत फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या शिक्षणासाठी आणि पुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी किडनी विकणे किती गरजेचे आहे, हे महिलेने नवऱ्याला पटवून दिले. नवऱ्याने तिच्यावर विश्वास टाकून किडनी विकली. त्यानंतर मिळालेले दहा लाख रुपये महिलेने स्वतःकडे ठेवले आणि रात्रीच प्रियकरासोबत फरार झाली. पतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हावडा जिह्यातील संकरेल येथे ही घटना घडली. महिलेला दहा वर्षांची मुलगी आहे. महिला किडनी विकण्यासाठी पतीवर दबाव टाकत होती. किडनी विकल्यानंतर आपल्या सगळय़ा आर्थिक समस्या सुटतील, मुलीचे शिक्षणही नीट होईल, असे नवऱ्याला समजवत होती. मुलीच्या भविष्यासाठी नवरा किडनी विकायला तयार झाला. दोघांनी किडनी विकत घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. ठरल्याप्रमाणे पतीने किडनी दिली आणि त्यांना दहा लाख रुपये मिळाले.
महिलेने ती सगळी रक्कम स्वतःकडे द्यायला सांगितली. उद्या बँकेत जमा करेन, असे नवऱ्याला सांगितले. पतीने विश्वासाने तिच्याकडे सगळे पैसे दिले. त्यानंतर ती महिला रात्रीच घरातून पळाली.
रविदास नावाच्या एका पेंटरसोबत बराकपूर येथे ती राहत असल्याचे त्याला समजले. त्यानंतर महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा डाव उघडकीस आला.