डेटिंग अ‍ॅपमुळे 6.3 कोटी रुपये गमावले

सध्या डेटिंग अ‍ॅपचा सुळसुळाट झाला आहे. पैसे मोजून डेटिंग अ‍ॅपवर आलेल्या एका घटस्फोटित व्यक्तीला प्रेमाचा शोध घेणे चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला महिलेने तब्बल 6.3 कोटी रुपयांना चुना लावला आहे. नोएडा येथे राहणारा व्यक्ती असून काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीची डेटिंग अ‍ॅपवर एका महिलेशी ओळख झाली होती. महिलेने या व्यक्तीला विश्वासात घेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तसेच मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले, परंतु गुंतवणुकीच्या नादात या व्यक्तीने एकूण 6.3 कोटी रुपये गमावले.