![cat with laptop](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/cat-with-laptop-696x447.jpg)
मांजरीने मालकिणीची नोकरी खाल्ली, असे कुणी सांगितले तर विश्वास बसेल का… नैऋत्य चीनमधील चोंगकिंग भागात अजब घटना घडली. एक 25 वर्षांची महिला तिच्या नोकरीला कंटाळली होती. तिला नोकरी सोडायची होती, मात्र आर्थिक अडचणीमुळे ती निर्णय घेऊ शकत नव्हती. महिलेने तिचा राजीनामा लिहून लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवला होता. फक्त एक बटण दाूबून तो बॉसला ईमेल करायचा होता. भविष्याचा विचार करून ती ते करू शकत नव्हती. एके दिवशी ती लॅपटॉप सुरू ठेवून तिथून निघून गेली आणि तिच्या घरातील मांजरांनी गोंधळ घातला. एका मांजरीने लॅपटॉपवर उडी घेतली आणि चुकून सेंडचे बटण दाबले गेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. जेव्हा महिलेला समजले की मांजरीमुळे तिचे राजीनामापत्र बॉसपर्यंत पोचले, तेव्हा तिने ताबडतोब कार्यालयात फोन करून ते स्वीकारू नका, अशी विनंती केली. मात्र तिच्या म्हणण्याकडे बॉसने दुर्लक्ष केले. त्यामुळे महिलेला बोनस आणि नोकरी दोन्ही गमवावे लागले.