ऐकावे ते नवलचं! महिलेने 2 दिवसांत दिला 2 मुलांना जन्म, डॉक्टरही चक्रावले

जगात अनेक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक दुर्मिळ घटना अमेरिकेतील अलाबामा शहरात घडली आहे. येथील एका महिलेने दोन दिवसात दोन मुलांना जन्म दिल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावरही झपाट्याने पसरत आहे. या घटनेने प्रसुतितज्ज्ञही चक्रावले आहेत.

केल्सी हॅचर असे या महिलेचे नाव आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बर्मिंगहॅम विद्यापीठ रुग्णालयात या महिलेने दोन दिवसात दोन मुलांना जन्म दिला. आधी तिने एका मुलीला जन्म दिला आणि मग 20 तासांच्या अंतराने तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. पण त्या मुली जुळ्या नाहीत. हे प्रकरण पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते.

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, हे गर्भधारणेचे दुर्मिळ प्रकरण आहे. असे क्वचितच आढळून येते. परंतु केल्सीची गर्भधारणा आणखी दुर्मिळ आहे. 2 हजारांपैकी एका महिला दुहेरी गर्भाशयाच्या माध्यमातून जन्म देते. केल्सीचे प्रकरण खरोखरच धक्कादायक असले तरी केल्सी आणि तिच्या दोन्ही मुली पूर्णपणे निरोगी आहेत.