
उत्तराखंडमधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रीलच्या नादात एक महिला वाहून जाताना दिसते. विशेष म्हणजे ही महिला तिच्या लेकीच्या डोळ्यादेखत वाहून गेली. संबंधित महिला तिच्या नातेवाईकांना भेटायला गेली होती. सोमवारी ती तिच्या 11 वर्षांच्या मुलीसह मणिकर्णिका घाटावर जात असताना ही घटना घडली. तिने तिच्या मुलीला आपला व्हिडीओ बनवण्यास सांगितले होते. वाहून गेलेली महिला अद्याप सापडलेली नाही.