वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली महिलेची फसवणूक झाली आहे. कुडाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो असे त्याना सांगण्यात आले होते. तक्रारदार महिला या वर्सोवा येथे राहतात. तिच्या मुलीने नीटची परीक्षा दिली होती. तिला वैद्यकीय प्रवेशासाठी म्हणून त्या प्रयत्न करत होत्या. तेव्हा त्यांची ओळख एका महिलेसोबत झाली.
त्या महिलेला तक्रारदार महिलेने प्रवेशाबाबत विचारले. त्यानंतर 2021 मध्ये त्या वर्सोवा येथे तिघांना भेटल्या. त्याने कुडाळ येथील महाविद्यालयाचे ट्रस्टचे आहोत असे भासवले. मॅनेजमेंट कोट्यातून एक जागेवर प्रवेश देऊ शकतो असे त्यांना सांगितले. त्यांच्याकडून 45 लाख रुपये पैसे घेतले. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात चारजणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.