
प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं शी इच्छा असते. फक्त सुंदर आणि रेखीव दिसण्यासाठी काहीजण शरिरावर लाखोंचा खर्च करून सर्जरी करतात. यामुळे काही जणांचे संपूर्ण आयुष्य़च बदलून जाते तर काही जणांना सर्जरीमुळे पश्चाताप सहन करावा लागतो. अशीच एक घटना पेनसिल्व्हेनियामध्ये घडली. एका महिलेने सुंदर दिसण्यासाठी आपल्या नाकाची सर्जरी करून त्याचा आकार बदलला. या सर्जरीमुळे तिचे संपूर्ण आयुष्यचं बदलले.
पेनसिल्व्हेनियातील फिलाडेल्फिया येथे राहणाऱ्या डेव्हिन एकेन (30) ने तिचे कंटाळवाणे जीवन बदलण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. ऐकेनला तिच्या विचित्र नाकामुळे टीका आणि नकार सहन कारावा लागला होता. शाळेत असताना तिच्या मित्रांनी तिच्या मोठ्या नाकाबद्दल तिला अनेकदा हिणवलं. तिला चेटकीण, लांबड्या नाकाची यासारख्या नावांनी चिडवलं. यामुळे त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. यानंतरचं तिच आयुष्य नैराश्यातचं गेलं. आयुष्यात मला खूप संघर्ष करावा लागला, असे तिने सांगितले.
सततच्या होणाऱ्या या टीकेमुळे तिचा आत्मविश्वास ढासळला होता. त्यामुळे जो मिळेल त्या मुलाशी डेव्हिनने 23 व्या वर्षी लग्न केलं. मात्र डेव्हिनच लग्न घाईघाईत झाल्यामुळे या दोघांनाही एकमेकांबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे या दोहांमध्ये सतत भांडणे होत होती. या रोजच्या भांडणांमुळे ती निराश झाली होती. दुसऱ्यांसाठी जगण्यापेक्षा, स्वत:साठी काहीतरी करावं अशी तिची इच्छा होती. नेहमी लोकांचे टोमणे ऐकण्यापेक्षा डेव्हिनने स्वत:साठी मोठा निर्णय घेतला.
दरम्यान डेव्हिनने फिलाडेल्फिया प्लास्टिक सर्जन डॉ. मार्क गिन्सबर्ग यांच्याकडून नाकाची राइनोप्लास्टी सर्जरी केली. सुमारे सहा तास चालणाऱ्या या प्रक्रियेला तब्बल 9 लाख खर्च केला. या शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी मिळालेल्या वेळेमुळे तिने नव्याने आयुष्य सुरू करत स्वतःसाठी वेळ देण्याचा विचार केला. रोजची भांडण तिला असह्य झाली होती. यामुळे तिेने तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. डेव्हिनने डिसेंबरमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला. आता ती स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आनंदात जीवन जगत आहे. तिची ही कहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
डेव्हिन सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने आपणी कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि यातून लोकांनाही संदेश दिला आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. हे तुमचे जीवन आहे – हे जीवन जगण्याची आपल्याला फक्त एकच संधी आहे. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करा, असे ती म्हणाली आहे.