Assembly Election 2024 : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सात जणांची माघार; १२ उमेदवार रिंगणात, ‘या’ पक्षांमध्ये होणार प्रमुख लढत

Kopargaon Assembly constituency
Kopargaon Assembly constituency

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. राज्यभरात सगळ्यात पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये काही पक्षांना अनेक विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यास यश मिळालं आहे. तर काही पक्षांना अपयश आलं आहे.

यातच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र आज शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता कोपरगाव विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये विविध पक्षांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर सात उमेदवार अपक्ष आहेत.

Assembly Election 2024 : कणकवली विधानसभा मतदारसंघात 6 उमेदवार मैदानात, कोण मारणार बाजी?

कोणत्या उमेदवारांनी राज घेतले मागे?

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजय सुभाष भगत (अपक्ष), शंकर सुखदेव लासुरे (रासप), बाळासाहेब कारभारी जाधव (अपक्ष), विजय नारायण वडांगळे (अपक्ष), राजेंद्र माधवराव कोल्हे (अपक्ष), मनिषा राजेंद्र कोल्हे (अपक्ष), अहिरे प्रभाकर पावजी (अपक्ष) यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

कोण आहेत निवडणुकीच्या रिंगणात?

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये आशुतोष काळे (अजित पवार गट), मेहबूब पठाण (बहुजन समाज पार्टी) ,संदीप वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), शिवाजी कवडे (बळीराजा पार्टी ), शकील चोपदार (बहुजन वंचित पार्टी), किरण चांदगुडे (अपक्ष), खंडु थोरात (अपक्ष), चंद्रहंस औताडे (अपक्ष), दिलीप गायकवाड (अपक्ष), विजय जाधव (अपक्ष), विश्वनाथ वाघ (अपक्ष), संजय काळे (अपक्ष) यांचा समावेश आहे.