दंगली चाललेल्या राज्यावर राज्य करणार का?

औरंगजेब जुलमी होता. त्याच्याबद्दल आस्था असण्याचे कारण नाही. मात्र, सध्या रोजगार, महागाई, शेतीमालाला बाजार नाहीत हे प्रश्न आहेत. अत्याचार आणि भ्रष्टाचार वाढला असून, नागपूरसारख्या घटना घडत आहेत. सरकारकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळत असेल तर हे दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच तुम्ही दंगली चाललेल्या राज्यावर राज्य करणार का? असा सवालदेखील त्यांनी सरकारला केला.

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आदी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. यावर थोरात म्हणाले, हे सरकार काहीही करू शकते. तसेच, मंत्री जयकुमार गोरे यांच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारालादेखील अटक केली. यामुळे राज्यात लोकशाही राहिलेली नाही.