आम्ही आरक्षण 50 टक्क्यांच्याही पुढे नेऊ- राहुल गांधी

मी आरक्षणाच्या विरोधात नाही. आम्ही आरक्षण 50 टक्के मर्यादेच्याही पुढे नेऊ, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात त्यांचे वक्तव्य काल कुणीतरी चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे स्पष्ट केले.

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी नॅशनल प्रेस क्लब येथे दिलेल्या मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला. वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या मतप्रदर्शनावरून वाद सुरू झाला होता. मात्र, काल कुणीतरी माझ्या वक्तव्यामुळे मी आरक्षणविरोधी असल्याचा चुकीचा अर्थ लावला होता. पण मी आरक्षणविरोधात नाही हे मला स्पष्ट करायचे आहे. आम्ही आरक्षण 50 टक्क्यांच्याही पुढे नेऊ, असे ते या मुलाखतीत म्हणाले.

 काय म्हणाले होते राहुल गांधी

भारत जेव्हा एक आदर्श, उचित ठिकाण असेल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, पण आता या घटकेला भारत तसे उचित ठिकाण नाही, असे ते विद्यापीठात म्हणाले होते. भारतातील 90 टक्के – ओबीसी, दलित आणि आदिवासींना डावलून तसे करता येणार नाही, असे ते म्हणाले होते.