पत्नीने पॉर्न पाहून हस्तमैथून करणे म्हणजे पतीसोबत क्रूरता नाही, उच्च न्यायालयाचे मत

जर पत्नी पॉर्न पाहून हस्तमैथून करत असेल तर ही बाब म्हणजे पतीबाबत क्रूरता नाही असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच या आधारावर घटस्फोट मिळू शकत नाही असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

तमिळनाडूत एका पतीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. आपली पत्नी सतत पॉर्न बघते आणि हस्तमैथून करते, घरात कुठलेही काम करत नाही तसेच विनाकारण पैसे खर्च करते असा आरोप पतीने आपल्या पत्नीवर केला होता.

यावर मद्रास कोर्टाने म्हटलं की पुरुषांमधील हस्तमैथुनाची पद्धत ही सामान्य समजली जाते तर स्त्रियांना याबाबत दोष का दिला जातो. हस्तमैथुन केल्यानंतर पुरुष लगेच सेक्स नाही करू शकत, पण स्त्रियांच्या बाबतीत असो होत नाही. जर पत्नी हस्तमैथून करत असेल तर त्यामुळे पती आणि पत्नीचे संबंधि बिघडू शकत नाही असे कोर्टाने म्हटले. तसेच हस्तमैथुनाबद्दल एका महिलेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं म्हणजे तिच्या लैंगित स्वायत्ततेचे उल्लंघन आहे. जर एखाद्या विवाहित महिलेने परपरुषासोबत शारिरीक संबंध ठेवले तर घटस्फोट मिळू शकतो. पण स्वतःचे लैंगिक सुख मिळवणे म्हणजे पतीसोबत क्रूरता नाही असे कोर्टाने म्हटले आहे.