उंच चपलेसाठी महिलेला हवाय घटस्फोट

नवऱ्याने उंच टाचेची चप्पल घेऊन दिली नाही. त्यामुळे महिलेने थेट नवऱ्यापासून घटस्फोट मागितला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हा प्रकार उघडकीस आला. 2024 म्हणजेच गेल्या वर्षी या महिलेचे लग्न झाले होते. या महिलेला आधीपासूनच उंच टाचेची सँडल घालण्याची सवय होती. महिलेने लग्नानंतर नवऱ्याकडे उंच टाचेच्या सँडलची मागणी केली. काही दिवसांनंतर नवऱ्याने तिला उंच टाचेचे सँडल आणून दिले, परंतु उंच टाचेमुळे ती पडली. तिला गंभीर दुखापत झाली. यानंतर नवऱ्याने पत्नीला उंच टाचेचे सँडल घालण्यास मनाई केली यावरून दोघांमध्ये वाद झाला. महिलेने मागचा पुढचा विचार न करता थेट नवऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तसेच नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा, अशी मागणी करत महिला एक महिन्यापासून माहेरी निघून गेली आहे.