पत्नी सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करीत नाही, याआधारे पती घटस्फोट मागू शकत नाही. पत्नीने बुरखा परिधान न करणे, तिने तिच्या मर्जीने घरातून बाहेर पडणे आणि इतर लोकांसोबत मैत्री ठेवणे या गोष्टी मानसिक छळ ठरत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंह आणि न्यायमूर्ती दोनादी रमेश यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवते. तसेच मार्केट व अन्य ठिकाणी एकटी जाते आणि बुरखाही परिधान करीत नाही. हा आपला मानसिक छळ आहे, असा आरोप करत पतीने घटस्फोट मागितला होता.