नवरा साडी नेसतोय, लिपस्टिकही लावतोय; घटस्फोटासाठी बायको पोहोचली कोर्टात

लग्नाच्या आठ वर्षांनंतर नवऱ्याने विचित्र चाळे सुरू केले, असा गंभीर आरोप करत एका महिलेने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली आहे. नवरा साडी नेसतोय, बायकांप्रमाणे लिपस्टिकही लावतोय, असे पतीचे म्हणणे आहे. नवरा मॅकेनिकल इंजिनीअर असून त्याला वारंवार सांगूनही तो हे सर्व करतो. त्यामुळे आपल्याला नवऱ्यापासून घटस्फोट हवाय, असे पत्नीने घटस्फोट याचिकेत म्हटले आहे. नवरा हा फक्त नावाला पुरूष आहे, परंतु सर्व चाळे बायकांप्रमाणे करतोय. नवऱ्याने आधारकार्डमध्येही आपले नाव बदलून घेतले आहे. या पती-पत्नीचा विवाह 2013 साली झाला होता. लग्नाच्या चार वर्षांनंतर म्हणजेच 2017 मध्ये एका मुलाचा जन्म झाला. 2021 मध्ये कंपनीच्या कामानिमित्त इंजिनीअर पतीला बंगळुरूला जावे लागले, परंतु बंगळुरूहून परत येताच त्याचे हावभाव संपूर्णपणे बदलले. तो पत्नीची साडी नेसू लागला. सुरुवातीला तिने याकडे मस्करी म्हणून पाहिले, परंतु तो रोजच साडी नेसू लागला. बायकोने साडी नेसण्यावरून हटकले. जाब विचारला. त्यावर त्याने उद्धटपणे सांगितले की, मी आता यापुढे रोज साडी नेसणार. कारण मला स्त्री व्हायचे आहे. स्त्री होण्यासाठी उपचार सुरू केले.

2021 पासून पती आणि पत्नी हे विभक्त राहू लागले. नवरा बंगळुरूमध्ये राहायला गेला, तर पत्नीने घर चालवण्यासाठी एका खासगी कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली. नवऱ्याने स्त्राr होण्यासाठी औषधे घ्यायला सुरुवात केली. तो लवकरच शस्त्रक्रिया करणार आहे. कुटुंबाने आपल्याला स्त्राr म्हणून पाहावे, असे सांगायलाही तो विसरला नाही. त्याला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे घटस्फोट मंजूर करावा, असे पत्नीने म्हटले.