पत्नीच निघाली ब्लॅकमेलर, पतीकडून उकळले 10 लाख रुपये

आजच्या काळात कोण कधी कुणाला धोका देईल सांगता येत नाही. उत्तरप्रदेशातील एका तरुणीने तर कहरच केला. तिने आनंद नावाच्या तरुणाला इन्स्टाग्रामवर प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्याच्यावर दबाव टाकून त्याला मंदिरात नेऊन लग्न केले. मात्र इथपर्यंत ती तरुणी थांबली नाही. तिने आनंदच्या नावाने फेसबुकवर खोटे अकाऊंट उघडले. त्याच्यावर दबाब टाकण्यासाठी त्या अकाऊंटवर दोघांचे खासगी पह्टो शेअर करून आनंदला पैशासाठी ब्लॅकमेल करू लागली. असे करून तिने लाखो रुपये आनंदकडून वसूल केले. श्वेता असे या तरुणीचे नाव आहे.

आनंदला फेक आयडी कुणी केला ते समजत नव्हते. त्या आयडीवर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केले जात होते. ते पह्टो हटवण्यासाठी आनंद पैसे देत होता. ज्या व्यक्तीला देत होता, तो कोण आहे, हे आनंदला कळत नव्हते. अशाप्रकारे तो 10 लाख रुपयांला लुटला गेला. अखेर आनंदने ही गोष्ट त्याच्या मामेभावाला सांगितली. त्याने फिरोजाबादच्या फरीहा पोलीस ठाण्यात 2021 तक्रार दिली. आनंदची पत्नी श्वेता हिने याआधी फसवणूक करून आनंदशी लग्न केले होते. त्यामुळ संशयाची सुई तिच्यावर गेल्याने ती पकडली गेली.