
आग्य्रातील टीसीएस मॅनेजर मानव शर्माच्या आत्महत्या प्रकरणी अखेर पत्नी निकिताला अटक करण्यात आली. गेल्या 40 दिवसांपासून ती अहमदाबाद येथे लपून बसली होती. मानव शर्माने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी मानवने व्हिडीओ शूट केला होता. तेव्हापासून पत्नी फरार झाली होती. निकिताच्या वडिलांनी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु कोर्टाने दिलासा दिला नाही.