Summer Foot Care- उन्हाळ्यात पायांना मसाज करण्याचे आहेत हे फायदे! वाचा सविस्तर


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पायाची लाही लाही होते, डोळ्यांची जळजळही वाढू लागते. उन्हामुळे आपल्या पायांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच उन्हाळ्यात पायांची निगा राखणं हे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात कोणत्या प्रकारची पादत्राणे घालावीत याचीही आपण काळजी घ्यायला हवी. म्हणूनच उन्हाळ्यात पायांना मसाज करण्याचा सल्ला हा दिला जातो. जेणेकरून आपण उन्हातील उष्णतेवर योग्य पद्धतीने मात करु शकतो. 
उन्हाळ्यात पायांना मसाज करण्याचे काय होतात फायदे
उन्हाळ्यात पायांच्या मसाज दरम्यान, तळवे देखील मालिश केले जातात, यामुळे घोट्याच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
40 वर्षांनंतर, स्त्रियांना अनेकदा घोट्याच्या आणि पायांच्या दुखण्याने त्रास होतो. अशावेळी घोट्याच्या दुखण्याने त्रस्त असाल तर पायाचा मसाज तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. रोज रात्री झोपताना पायाची मालिश करावी. यामुळे दुखण्यात आराम मिळेल.
उन्हाळ्यात पायांना मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे नसा आराम होतो आणि घोट्याच्या वेदना कमी होतात.

उन्हाळ्यामध्ये पीरियड्स येतात तेव्हा शरीरातील उष्णता ही अधिक वाढते. अशा स्थितीत पायांना मसाज करून मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. पायांना मसाज केल्याने मासिक पाळीच्या दरम्यान मूड स्विंगपासूनही आराम मिळतो, तसेच थकवाही कमी होतो.

उन्हाळ्यात रात्रीची झोप येत नाही, अशावेळी रोज रात्री पायाला तेलाने मसाज केल्यामुळे, शरीराचा थकवा आणि तणाव दोन्ही दूर होतील आणि चांगली झोपही लागेल.

दिवसभराच्या थकव्यामुळे अनेकदा स्नायू दुखतात. अशा परिस्थितीत, यापासून आराम मिळवण्यासाठी, आपण दररोज पायांची मालिश करू शकता. स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळेल. तसेच तुम्हाला आराम वाटेल. पायाला मसाज केल्याने स्नायू सक्रिय होतात.

उन्हाळ्यात पायांना मोहरीच्या तेलाने मालिश करण्याचेही खूप फायदे होतात. मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे तणावही दूर होतो. हलक्या सूर्यप्रकाशात मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळतो.

उन्हाळ्याच्या दिवसात ऑलिव्ह ऑईल पायांना मसाज करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या तेलाचा वापर केल्याने पाय दुखण्यापासून आराम मिळतो. त्याच वेळी, तणाव दूर होतो. ऑलिव्ह ऑइल हलके कोमट करून मसाज करावे.

पायांना मसाज करण्यासाठी प्रथम कोमट पाण्याने पाय धुवा. आता सुती कापडाने पाय पूर्णपणे स्वच्छ करा. आता तेल कोमट करा. आता दोन्ही पायांना तेल लावा. पायांना हलक्या हातांनी मसाज करा. तुम्हाला पायाशी संबंधित कोणत्याही आजाराने त्रास होत असेल तर मालिश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.