Summer Tips- उन्हाळ्यात घरी गुलाबजल का असायला हवं! वाचा सविस्तर

उन्हाळ्यात आपल्या त्वचेची अक्षरशः लाही लाही होते. परंतु घरातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे, उन्हाळ्यात आपण बाहेर पडतोच. उन्हाळ्यात घामामुळे आणि धुळीमुळे आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो. याच उन्हाळ्यातील अडचणींवर मात करण्यासाठी गुलाबजल हा एक उत्तम पर्याय आहे. गर्मीच्या दिवसांमध्ये गुलाबजल हे खूप उपयुक्त मानले जाते. उन्हाळ्यात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गुलाबजल हे असायलाच हवे.  गुलाबजल हे बहुतांशी सर्व घरांमध्ये असते, नसेल तर तुम्ही खासकरुन गर्मीच्या सीझनमध्ये विकत आणा. त्वचेसाठी गुलाबजलचे फायदे हे अपरिमित आहेत.
त्वचेसाठी गुलाबजलचे फायदे
गुलाबजलमधील पोषक द्रव्ये ही त्वचेसाठी उपयुक्त आहेत, म्हणूनच फार पूर्वीपासून गुलाबजल हे सौंदर्यसाधनेत वापरले जाते.
गुलाबजल केवळ त्वचेसाठीच नाही तर, केसांसाठी सुद्धा खूप पोषक मानले गेलेले आहे.
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी सुद्धा गुलाबजल हा बेस्ट पर्याय आहे.
गुलाबजलाचे सौंदर्य आणि शारिरीक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळेच गुलाबजलाची एखादी बाटली ही आपल्या घरात असणे हे केव्हाही उत्तम आहे. येत्या गर्मीला तोंड देताना तुम्हीही घरी एक गुलाबजल बाॅटल आणून ठेवा.
आपल्या त्वचेसाठी गुलाबजल हे मुख्यतः टोनर म्हणून कार्य करते. त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
गुलाबजल फेस पॅकमध्ये कालवून लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो, तसेच त्वचेला निखार येण्यासही मदत होते.
गुलाबजलामध्ये थोडे पाणी मिसळुन हे पाणी उन्हातून घरी आल्यावर त्वचेवर फवारल्यास त्वचेला तजेला प्राप्त होतो.
कोरफड जेल, गुलाबपाणी फेसपॅक केल्यास हा फेसपॅकही गर्मीत एक उत्तम पर्याय मानला जातो.
मुलतानी माती आणि गुलाबजल हा फेसपॅकही सर्वात उत्तम फेस पॅक मानला जातो.
रात्री झोपण्याआधी गुलाबजल आणि कोरफड जेल फेसपॅक लावल्यास झोपही उत्तम लागते.
निस्तेज त्वचा झाल्यावरही गुलाबजल हा एक रामबाण उपाय आहे. निस्तेज त्वचेला गुलाबजल लावल्यामुळे, त्वचा उजळ होण्यास मदत होते.
(वरील कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)