Siddharth Jadhav- रणवीर सिंह दीपिकाच्या लग्नात अभिनेता सिद्धार्थ जाधवला ‘घाम’ का फुटला? वाचा सविस्तर

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा त्याच्या हरहुन्नरी अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. सिद्धार्थने कायमच त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांनी मनोरंजन केले आहे. नुकताच सिद्धार्थने एका कॅचअप या पाॅडकास्टला मुलाखत देताना त्याच्या आयुष्यातील चढ-उताराबद्दल भाष्य केले होते. अमोल परचुरे यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून सिद्धार्थने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची आणि घटनांची उकल या पाॅडकास्टच्या माध्यमातून केलेली आहे.

सिद्धार्थने या मुलाखतीमध्ये सांगितलेला एक किस्सा खूप भन्नाट आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नात तो केवळ गेला आणि लगेच निघाला होता. केवळ तो या लग्नामध्ये दहाच मिनिटे का थांबला होता, याचा एक प्रसंग सिद्धार्थने सांगितला. सिद्धार्थ म्हणतो, मी रणवीर सिंग आणि दीपिका या दोघांच्या लग्नासाठी जाताना खूपच एक्सायटेड होतो. परंतु नंतर मात्र तिथे गेल्यावर मला दरदरून घाम फुटू लागला. तिथे आलेल्या एकसे बडकर एक सेलिब्रिटींना बघून माझ्यापायाखालची जमिन सरकली असे सिद्धार्थ म्हणतो.

अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर असे एकापेक्षा एक दिग्गज सेलिब्रिटी पाहूनच सिद्धार्थला एकदम घाम फुटलेला होता. म्हणून त्या लग्नात काहीही न खाता त्याने अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्या लग्नातून काढता पाय घेतला होता. पाॅडकास्टमध्ये सिद्धार्थने त्याच्या बॅडपॅचपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या अनुभववावर भाष्य केलेले आहे. नाटक, सिनेमा यातील त्याचा एकूणच प्रवास, आॅडिशनचे किस्से अशा सर्व विषयांवर सिद्धार्थने अगदी मनमुराद मोकळेपणे गप्पा मारलेल्या आहेत.

सिद्धार्थने कायमच विविधांगी भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘दे धक्का’, ‘लोच्या झाला रे’ या त्याच्या चित्रपटांनी बाॅक्स आॅफिसवर भरघोस कमाई केलेली आहे.