
सलमान खानचा बहुचर्चित ‘सिकंदर’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि या टीझरला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. परंतु असे असले तरी सध्याच्या घडीला ‘सिंकदर’च्या प्रमोशनमध्ये अचानकपणे मोठे बदल करण्यात आले आहेत. ‘सिकंदर’च्या प्रमोशनसाठी आधी संपूर्ण टीम 30 हजार चाहत्यांसह ट्रेलर लाँच करण्याची योजना आखत होती, परंतु आता मात्र सर्व कार्यक्रमामध्ये अचानक बदल करण्यात आलेले आहेत.
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर 23 किंवा 24 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात लाँच होणार होता. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव मात्र सलमान खान या ट्रेलर लाॅंचला उपस्थित राहणार नसल्याचे कळत आहे. सलमान डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे चित्रपटाचे प्रमोशन करणार असल्याचे सांगितले जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सलमान खानला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असले तरी, चाहत्यांनो निराश होऊ नका. या चित्रपटाचा ट्रेलरही डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या थाटामाटात लाँच होणार आहे. ट्रेलर लाँच झाल्यानंतर चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होईल. एकूणच काय तर, पडद्यावरचा टायगर आता खाजगी जीवनात डिजिटल ट्रेलर लाॅंचिंगला उपस्थित राहणार आहे.
सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे सलमानला पोलीसांकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींनुसार सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळेच कोणत्याही मोठ्या कार्यक्रमा ठिकाणी सलमान सध्याच्या घडीला दिसत नाही. सलमान खान याने कायमच ईदच्या निमित्ताने त्याचा जलवा दाखवला आहे. यंदाच्या ईदला सिंकदर मोठ्या पडद्यावर कसा परफाॅर्म करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे.