
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हिंदुस्थानात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार होते. परंतु या मदतीच्या आडून बायडेन हिंदुस्थानात नेमके कुणाला जिंकवण्याचा प्रयत्न करत होते, असा सवाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी मोदी सरकारशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
देशात मोदी सरकारविरोधी वातावरण तयार झाल्याने 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. भाजपला एनडीएतील घटक पक्षांच्या कुबडय़ा घेऊन सत्ता स्थापन करावी लागली. एक्झिट पोलमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे दाखवण्यात येत होते. परंतु 4 जून रोजी लागलेल्या निकालात परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे.