व्हिटॅमिन ‘के’ सोबत व्हिटॅमिन ‘डी’ घेणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या कारण

Vitamin-D and K Benefits: शरीरासाठी प्रत्येक प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते. ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. या घटकांमध्ये जीवनसत्त्वे देखील समाविष्ट आहेत. तुम्ही व्हिटॅमिन सी बद्दल ऐकले असेल आणि त्याचे फायदे सुद्धा माहित असतील, पण तुम्ही कधी व्हिटॅमिन डी आणि के बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला याचबद्दल सांगणार आहोत. हे दोन आवश्यक जीवनसत्त्वे देखील आहेत, जे आपली हाडे आणि स्नायू मजबूत करण्याचे काम करतात.

व्हिटॅमिन डी आणि के दोन्ही एकमेकांना पूरक मानले जातात. एका अहवालानुसार, दोन्ही जीवनसत्त्वे एकत्र घेतले पाहिजेत, कारण या दोन्हीमुळेएंक फायदे मिळतात. व्हिटॅमिन डी सोबत व्हिटॅमिन के का घ्यावं, याची कारणं जाणून घेऊ…

व्हिटॅमिन ‘डी’चे फायदे

  • व्हिटॅमिन डी आपली हाडे मजबूत करते.
  • व्हिटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती वाढवतं.
  • या जीवनसत्वामुळे संसर्ग टाळता येतो.
  • कॅन्सर आणि मधुमेहाचा धोका व्हिटॅमिन डीने कमी केला जाऊ शकतो.

व्हिटॅमिन ‘के’चे फायदे

  • व्हिटॅमिन के रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते.
  • हे जीवनसत्व चयापचय मजबूत करते.
  • व्हिटॅमिन के इंसुलिनचे प्रमाण संतुलित करते.
  • ‘डी’सह व्हिटॅमिन के हाडे मजबूत करते.

या दोघांना एकत्र का घ्यावं?

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, व्हिटॅमिन के सप्लिमेंट्ससोबत व्हिटॅमिन डी न घेतल्यास त्याचा शरीराला कोणताही फायदा होणार नाही. के सोबत व्हिटॅमिन डी घेतल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळते. या वृत्तानुसार, व्हिटॅमिन केशिवाय व्हिटॅमिन डी घेतल्यास विपरीत परिणाम होऊ शकतो. अशातच व्हिटॅमिन डीचा आपल्या किडनी आणि यकृतावर परिणाम होतो. याशिवाय, कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि के एकत्र घेण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन डी आणि के चे मिश्रण देखील आपले हृदय निरोगी ठेवते. यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि कोलेस्टेरॉल शिरांमध्ये जमा होण्यापासूनही बचाव होतो.