Sunita Williams- सुनीता विल्यम्स अंतराळात भगवद्गीता आणि ओम चिन्ह का घेऊन गेल्या होत्या? वाचा सविस्तर

अंतराळातून सुनीता विल्यम्स यांनी पृथ्वीवर पाय ठेवताक्षणी हिंदुस्थानातील जनतेचा ऊर अभिमानाने भरून आला. तब्बल ८ महिन्यांपेक्षा जास्त काळ सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे अंतराळात अडकले होते. म्हणूनच या दोघांची पावलं पृथ्वीवर पडताक्षणी, पृथ्वीवरील सर्वांचीच पावलं आनंदाने थिरकू लागली.

 

 

सुनीता विल्यम्स यांच्या  पतीचे नाव मायकेल जे. विल्यम्स. मायकल विल्यम्स हे व्यवसायाने एक फेडरल मार्शल आहेत. त्यांच्याकडे अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेचे रक्षण करणे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सोपवण्यात आले आहे. सुनीता आणि मायकल पहिल्यांदा 1987 साली एकमेकांना भेटले.

 

सुनीता विल्यम्स आणि मायकेल या दोघांची प्रेमकथा परीकथेसारखीच आहे. नासापूर्वी, सुनीता अमेरिकन नौदलात पायलट होत्या आणि याच काळात त्यांची मायकेल यांच्यासोबत भेट झाली. दोघेही हेलिकॉप्टर उडवायचे आणि या भेटींमधूनच त्यांची मैत्री घट्ट झाली. नाते मैत्रीतून प्रेमात बदलले आणि दोघांनीही एकमेकांचे जीवनसाथी होण्याचा निर्णय घेतला.

 

लग्नानांतर मायकेल जे. विल्यम्स यांनी हिंदू धर्म स्विकारला असून, तेही हिंदू धर्मातील रिती रिवाजांचे पालन यथासांग करतात. त्याचबरोबरीने सुनीता यांच्या धार्मिक श्रद्धेचाही आदर करतात.  2006 मध्ये  सुनीता या पहिल्यांदा अंतराळात गेल्या, त्यावेळी त्यांनी सोबत भगवद्गीता आणि ओम चिन्ह अंतराळामध्ये नेले होते.

केवळ इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या प्रत्येक अंतराळ मोहीमेमध्ये भारतीय संस्कृतीला कायम मानाचे स्थान दिले होते. 2012 मध्ये, त्यांनी शंकराचा एक छोटा फोटोही सोबत नेला होता. त्याचबरोबर उपनिषादांची प्रतही त्यांनी सोबत ठेवली होती. सुनीता विल्यम्स यांनी नेहमीच हिंदुस्थानी संस्कृती आणि परंपरांशी आपली नाळ घट्ट जोडलेली आणि जपलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच सुनीता विल्यम्सच्या येण्याने हिंदुस्थानात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.