![curd](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/10/Curd-696x447.jpg)
आरोग्य हीच खरी संपत्ती असे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले आहे. म्हणूनच आरोग्य जपणे हे आपले महत्त्वाचे कार्य आहे. सध्याच्या फास्ट फूडच्या युगात आपण अनेकदा जिभेवर ताबा ठेवू शकत नाही. परंतु बाहेर पडल्यावर करणार तरी काय हा प्रश्न उद्भवतो. धावपळीच्या युगात आपले लाईफस्टाईल हे खूपच बदलले आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळाही बदलल्या. त्यामुळेच बाहेर पडल्यावर जे मिळेल ते आणि उपलब्ध असेल ते, खाण्याकडे आपला कल असतो.
निरोगी जीवनासाठी निरोगी पाचन तंत्र खूप महत्वाचे आहे. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, अशांना बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅस आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. निरोगी पाचन तंत्र नसल्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यासाठी आपले अन्नपचन व्यवस्थित होणे हे खूप गरजेचे आहे.
निरोगी पाचन तंत्रामुळे आपली उर्जा, प्रतिकारशक्ती आणि आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. आपली पाचन प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी, आपण आपल्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आहारात निरोगी पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
उत्तम पाचन तंत्रासाठी हा पदार्थ आहारात समाविष्ट करायला हवा.
दही आपल्या पचनासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यात असणारे बॅक्टेरिया अन्नपचन करण्यास मदत करतात. दही अतिसार सारख्या पचन समस्या दूर करण्यासही मदत करते. त्यामुळे अन्न पचनासाठी खूपच मदत होते. शिवाय दही सकस आहारामध्येही येते. त्यामुळेच आपण दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात एक वाटी दही घ्यायलाच हवे.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)