
पूर्वीच्या काळी एक म्हण होती, तूप खा रुप येईल. तूपाचा वापर हा आपल्या आहारामध्ये फार पूर्वीपासूनच होता. तुपामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात. परंतु याचा योग्य प्रमाणात वापर केला तर तूप हे आपल्यासाठी नक्कीच वरदान ठरेल यात शंका नाही. तूप खाण्यामुळे रुप तर येईलच, पण आपल्या शरीरासाठीही असंख्य फायदे होतील. तूप कोणत्याही अन्नाची चव वाढवते पण ते योग्य प्रमाणात सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त तूप खाल्ले तर ते तुमचे अनेक नुकसान करू शकते. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई सोबत हेल्दी फॅट, कॅल्शियम आणि ओमेगा-३ सारखे गुणधर्म आढळतात, जे शरीराला अनेक फायदे देण्यास मदत करतात.
दररोज तूप खाण्याचे फायदे
तूप खाल्ल्याने आपली पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते. तसेच पोटातील आम्लता नियंत्रित करण्यासही तूपाचा वाटा फार मोलाचा आहे.
तुपामध्ये निरोगी चरबी असते, जी ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. आपल्याला अशक्तपणा वाटत असेल तर तूप खाण्यामुळे अशक्तपणावर मात करता येते.
तुपामध्ये जीवनसत्त्वे असल्यामुळे, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
तूपाचा योग्य वापर आपल्या आहारात केल्यास, वजनही नियंत्रित राहायला मदत होते.
तूपामुळे मेंदूला पुरेसा आॅक्सिजन मिळतो, त्यामुळे अल्झायमरसारख्या आजारांना प्रतिबंध होतो.
तूप हे हाडांसाठी वंगण म्हणून काम करते. त्यामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यावर तूप हा उत्तम पर्याय मानला जातो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)