Alia Bhatt- आलिया भट्टने सोशल मीडियावरुन ‘राहा’चे फोटो का डिलीट केले! जाणून घ्या

सध्याच्या घडीला तुम्हाला घरबसल्या प्रसिद्धी मिळवायची असेल तर, एकमेव माध्यम म्हणजे सोशल मीडिया हेच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका क्लिकच्या माध्यमातून तुम्ही लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचता. परंतु हाच सोशल मीडिया जितका फायद्याचा तितकाच तोट्याचाही आहे. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट. तुम्ही कोणत्या बाजूवर जास्त फोकस करता हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे.

सोशल मीडियावर बाॅलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या विविध उपक्रमांचे फोटो पोस्ट केलेले असतात. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची कन्या ‘राहा’ हिचे फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नुकतेच डिलीट केले. सध्या या आलियाच्या कृतीवर सोशल मीडियावर चर्विताचर्वण सुरु आहे.

 

सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक फॅन्स हे नजर ठेवून असतात. त्यामुळे सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा गोत्यातही येते. आलियाने राहाचे फोटो डिलीट केल्यानंतर, सोशल माध्यमावर अनेक चर्चांना उधाण आले. यावर आलियाने मात्र तिचा स्टॅंड हा खूप सजगपणे घेतला असल्याचेही पाहायला मिळत आहे. मुलांच्या प्रायव्हसीचा विचार करता हा निर्णय आलियाने घेतला आहे असे म्हटले जात आहे.

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे कोणतीही कृती करताना तुम्हाला सारासार विचार करावा लागतो. आलियाने फोटो डिलीट केल्यानंतर, युजर्सच्या प्रतिक्रियांचा देखील पाऊस पडला. अनेकांनी आलियाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागतच केले आहे. तर दुसरीकडे मात्र फोटो डिलीट केल्यामुळे, आलियाला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागत आहे. एकूणच काय तर माध्यमांचा उपयोग आणि त्याचे फायदे तोटे याचा सर्वांगी विचार करता, तुम्ही काय पोस्ट करता यावर खूप काही अवलंबून आहे.