Aashram- ‘आश्रम’ वेब सीरीजमुळे माझ्या करिअरला मिळाली नवी उभारी! – बाॅबी देओल

बाॅबी देओल या नावातलं वलय खरंतर आडनावात आहे. दस्तुरखुद्द धर्मेंद्र यांचा मुलगा म्हणून बाॅबीने बाॅलीवुडमध्ये प्रवेश मिळवला. तसंही बाॅलीवुडमध्ये तुम्ही कोणाची मुलं आहात, यावर तुमचा प्रवेश ठरतो. बाॅबीच्या नावाला दोन महत्त्वाचे सपोर्ट होते, दस्तुरखुद्द धर्मेंद्र आणि सनी देओल.  परंतु बाॅबी हा आल्या आल्या त्याला झिपऱ्या असेच म्हटले गेले. बाॅबीला फार कुणी सीरियस घेतलं नसल्याने बाॅबी काही चित्रपट करुन गायबच झाला. तो नंतर फारसा कुठे दिसला नाही. परंतु बाॅबीच्या करिअरला नवसंजीवनी मिळाली ती ‘आश्रम’ या वेबसीरीजमुळे.

 

‘आश्रम’ वेबसीरीजमधला बाबा निराला ही भूमिका बाॅबी देओलच्या करिअरमधला मैलाचा दगड होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संपुष्टात आलेल्या बाॅबी देओलच्या करिअरला उभारी दिली ती, प्रकाश झा यांच्या निवडीने. ‘आश्रम’ वेबसीरीजसाठी बाबा निराला या भूमिकेसाठी बाॅबी देओलवर विश्वास ठेवणं यालाच म्हणतात हिऱ्याची निवड एक जोहरीच करु शकतो. चेहऱ्यावर काहीही भाव नसलेला बाॅबीने बाबा निरालाची भूमिका मात्र चपखल वठवली. म्हणूनच आजही अनेक मुलाखतींमध्ये बाॅबी देओल ‘आश्रम’  वेबसीरीजचा उल्लेख न चुकता करतो.

अभिनेत्रींच्या मागे पळणारा बाॅबी देओल आता बाबा निराला झाला आणि तिथूनच त्याच्यातला खरा अॅनिमल बाहेर पडला. ‘अॅनिमल’ हा चित्रपट तर बाॅबीच्या करिअरमधील एक अत्युच्च कळस ठरला. संवाद न साधता बाॅबी या चित्रपटाच्या माध्यमातून खूप बोलून गेलाय.

स्वतःवरचा बाॅबीचा विश्वास उडाला होता त्यावेळी प्रकाश झा यांनी मात्र बाॅबीवर विश्वास टाकला होता असे बाॅबी अगदी बिनदिक्कतपणे सांगताना दिसतो. नुकताच ‘आश्रम’  या वेबसीरीजचा पुढचा भाग येत्या काही दिवसामध्येच येईल. ‘आश्रम’ 4 ची उत्सुकता हीच ‘आश्रम’  वेबसीरीजच्या यशाची पोचपावती आहे असे म्हणता येईल. बाबा निराला आणि बोपा भाई यांची अभिनयाची केमिस्ट्री पाहण्यासाठी आता फक्त काही काळाचा अवकाश उरलाय.