डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईचा भडका उडाल्याचे समोर आले आहे. या महिन्यात घाऊक महागाई 2.37पर्यंत वाढली, तर नोव्हेंबरमध्ये ती 1.89 टक्के आणि ऑक्टोबर महिन्यात 2.36 टक्के होती. बटाटे, कांदे, अंडी, मांस, मासे आणि फळे यांचे घाऊक भाव वाढले होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज आकडेवारी जाहीर केली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू 5.49 टक्क्यांवरून 6.02 टक्क्यांपर्यंत वाढल्या, तर खाद्य पदार्थांची महागाई 8.92 टक्क्यांवरून 8.89 टक्क्यांवर गेली. उत्पादनांचा महागाई दर 2.14 टक्क्यांपर्यंत वाढला.