त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार? जितेंद्र आव्हाड यांचा मोहन भागवत यांना सवाल

दोन ते तीन मुलं जन्माला घाला असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. पण या त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच चार मुलांसाठी तुम्ही पालकांवर दबाव आणणार आहात का असेही आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या जगात कुणाला खऱ्या अर्थाने अर्थशास्त्र कळत असेल तर ती गृहिणी आहे. जेव्हा महागाई वाढते, शाळेची फी वाढते तेव्हा त्या गृहिणीला माहित असतं घर कसं चालवायचं. तुम्ही काहीही बोलू शकता, पण त्या मुलांची जबाबादारी कोण घेणार? त्यांना खायला कोण घालणार? त्यांना शाळेत कोण घालणार? त्यासाठी एवढी संसाधनं आहेत का? हिंदुस्थान तेवढा श्रीमंत आहे का?

तसेच कुणी किती मुलं जन्माना घालावी हे त्यांच्यावर सोडा. हा निर्णय त्या त्या दाम्पत्यांचा आहे. आता चार मुलांसाठी तुम्ही पालकांवर दबाव आणणार का? असेही आव्हाड म्हणाले.