Kapil Sharma- कपिल शर्मा सोबत कोण आहे ‘ती’!

काॅमेडियन कपिल शर्मा आता ‘किस किसको प्यार करू’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्याची भूमिका पुन्हा साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 2015 मध्ये आला होता. तसेच अब्बास-मस्तान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अनुकल्प गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली या सिक्वेलमध्ये विनोदाची भट्टी जमणार आहे. ईदच्या निमित्ताने, कपिलने ‘किस किसको प्यार करू 2’ चा पहिले पोस्टर शेअर केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

पोस्टरमध्ये कपिलच्या शेजारी त्याची ‘पत्नी’ उभी आहे, तिने निळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. अर्धपारदर्शक बुरख्याने या अभिनेत्रीचा चेहरा झाकल्याने, तिच्याविषयी आता कुतूहलता निर्माण झालेली आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन करणारे अब्बास-मस्तान आता सिक्वेलचे दिग्दर्शन करणार नाहीत, परंतु सह-निर्माते म्हणून ते या चित्रपटासाठी कायम राहणार आहेत. मूळ पटकथेचे लेखक आणि कपिलच्या लोकप्रिय टीव्ही शो ‘द कपिल शर्मा शो’साठी प्रसिद्ध असलेले अनुकल्प गोस्वामी हे दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहेत.

‘फुकरे’मधील भूमिकेसाठी ओळखले जाणारे मनजोत सिंग यांचाही या चित्रपटामध्ये समावेश आहे. मूळ चित्रपट, किस किसको प्यार करू कपिलच्या व्यक्तिरेखेभोवती फिरतो, शिव राम किशन, जो त्याच्या अनुकरणात तीन महिलांशी लग्न करतो आणि त्याच्या प्रेयसीशी असलेले त्याचे नाते अबाधित ठेवतो. पहिल्या भागात एली अवराम कपिलच्या प्रेयसीच्या भूमिकेत आणि मंजरी फडणीस, सिमरन कौर मुंडी आणि सई लोकुर यांनी त्याच्या तीन पत्नींच्या भूमिकेत काम केले होते. यंदा मात्र पोस्टरमुळे आता ती कोण आहे याबाबत आता कपिलच्या फॅन्सची उत्सुकता ताणली गेली आहे.