
आमिर खानच्या आयुष्यात आता तिसऱ्या जोडीदाराने प्रवेश केलेला आहे. रीना, किरण नंतर आता आलीय गौरी… आमिर खानने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याची नवीन होणारी जोडीदार गौरी स्प्रेटची मीडियासमोर ओळख करून दिली. गौरी बंगळुरूची असून, ती आमिर खान फिल्म्समध्ये काम करते. आमिरच्या कुटुंबाने गौरी आणि आमिरच्या नात्याला हिरवा कंदील दाखवला आहे. आमिरने गौरीचे गुपित माध्यमांसमोर उघड केल्यानंतर पुन्हा एकदा आमिरच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे.
13 मार्चला माध्यमांसमोरील भेटीत आमिरने गौरीची ओळखही करुन दिली. पण त्याने माध्यमप्रतिनिधींना नम्रपणे दोघांचाही फोटो काढू नये अशी विनंती केली. असे म्हटले जाते की, आमिर आणि गौरी गेल्या एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. माध्यमांनुसार आमिर आणि गौरीचा प्रेम हे वर्षाभरापूर्वीचे आहे. असे असले तरी त्यांची ओळख ही गेल्या 25 वर्षांपासूनची आहे.
कोण आहे ही आमिरच्या आयुष्यातील गौरी?
गौरी ही मूळची बंगळुरूची असून, ती बऱ्याच काळापासून आमिर खानच्या निर्मिती संस्थेत काम करतेय. गौरीने लंडनमधील कला विद्यापीठातून फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफडीए केले आहे. गौरीची आई तमिळ आहे आणि वडील आयरिश आहेत. गौरीचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरी ही स्वतः एका सहा वर्षांच्या मुलाची आई देखील आहे.
आमिर खानसोबत इतका काळ काम करूनही गौरीने आत्तापर्यंत आमिरचे ‘लगान’ आणि ‘दंगल’ हे असे मोजकेच चित्रपट पाहिले आहेत. आमिरने माध्यमांना सांगितले की, गौरीला त्याच्या कुटुंबाने आनंदाने स्वीकारले आहे. आमिरने गौरीशी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याशीही ओळख करुन दिली आहे.