अनेकदा वाचन करताना किंवा अभ्यास करताना झोप येते. अभ्यासाचा कंटाळा किंवा आळस हे त्याचे मुख्य कारण आहेच. त्यासोबतच इतर अनेक गोष्टीही त्याला कारणीभूत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
अभ्यास करताना झोप येण्याची मुख्य कारणे
अति मानसिक ताण
वाचन करणे किंवा अभ्यास हा एक मेंदूला थकवा देणारी प्रक्रिया आहे. जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा नविन माहिती मिळवण्याचे काम मेंदू करत असतो. या क्रियेमुळे मेंदूवर ताण येऊन झोप लागते.
अनियमित झोप
जेव्हा तुमची रात्रीची झोप पुर्ण होत नाही, तेव्हा अनियमित झोपेमुळे सकाळी झोप येऊ लागते. त्यामुळे सकाळी अभ्यासाच्या वेळी झोप लागते.
पौष्टीक आहार न घेणे
शरीरासाठी अपायकारक असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने शरीरात तेल, साखर, आणि कॅफेन सारख्या गोष्टिंमुळे शरीराला थकवा जाणवतो ज्यामुळे शरीर जड होते आणि झोप येते.
आभ्यासावेळी चुकीच्या सवयी
एकाच अवस्थेत जास्त वेळ अभ्यसाला बसणे किंवा रिकाम्या अंधाऱ्या रुममध्ये एकटे बसून अभ्यास करणे नियमित वेळेत पाणी न पीने आणि दर 30 मिनिटाने ब्रेक न घेणे त्यामुळे मेंदू लवकर थकतो.
शारीरिक समस्या
आपल्याला जर एनिमिया, थायरॉइड किंवा डिप्रेशन असेल तर मेंदूवर जास्त आणि लवकर ताण येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे झोपही लागते.