तुझा पूर्ण फोटो पाठव…, नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणीला आला भयंकर अनुभव

नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या एका तरुणीने नुकताच तिच्यासोबत घडलेला एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. या घटनेत एका कंपनीच्या मॅनेजरने नोकरी शोधत असलेल्या एका तरुणी नको ते मॅसेज पाठवले आहेत. तरुणीने त्यांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

तरुणीने तिच्या Raddit या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने कंपनी रिक्रूटरचा अश्लिलपणा उघड केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुणीने नोएडामध्ये पर्सनल असिस्टंट (पीए) पदासाठी अर्ज केला होता. या कंपनीत पगाराचे पॅकेज चांगले होते. मात्र रिक्रूटरचे वर्तन खूप विचित्र आणि त्रासदायक होते. मला या कंपनीकडून त्यांच्या रिक्रूटरचा मॅसेज आला. यावेळी आमच्यात कामासंदर्भात आणि पगारासंदर्भात बोलणं झालं, असे तिने सांगितले.

तरुणीला कंपनीने मान्य केलेल्या पगारात वाढ हवी होती. यासाठी त्यांच्यात बोलणे सुरू होते. पगारवाढीबाबत बोलताच त्याने पगारवाढ लगेच मंजूर केली. मात्र त्याआधी तुझा पूर्ण फोटो पाठव, असा मॅसेज केला. यावेळी तरुणीने त्या मॅसेजवर आक्षेप घेतला. मी माझा फोटो पाठवू शकत नाही. जर मला ऑफर लेटर मिळाले तर मी माझे इतर तपशील म्हणजे पासपोर्ट आकाराचा फोटो पाठवू शकते, असे ती यावेळी म्हणाली.

दरम्यान, रिक्रूटरने आणखी एक विचित्र मागणी केली होती, असे महिलेने सांगितले. त्याने तरुणीला तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलची माहिती मागितली. कारण त्याला तरुणीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे होते. यावरही तरुणीने सडेतोड उत्तर दिले. माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हे माझे वैयक्तिक अकाऊंट आहे. या सगळया गोष्टींची मागणी गरजेची आहे का? जर तुम्ही माझा इंटरव्ह्यू स्केड्यूल केलात तर मी ऑफिसमध्ये येईन. तुम्हाला चांगली उत्तर देईन. त्यामुळे मी अशी वैयक्तिक माहिती देऊ इच्छित नाही, असे ती म्हणाली.

सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी लोकांनी तिला अशा कंपन्यांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणतीही कंपनी अशा प्रकरची मागणी करू शकत नाही. त्यामुळे अशा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे.