
हिंदुस्थानात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍप मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. परंतु व्हॉट्सऍपने अवघ्या महिनाभरात 89 लाखांहून अधिक अकाऊंटवर कारवाई करत ही अकाऊंटस् बंद केली आहेत. मेटा कंपनीने ही कारवाई केली असून या अकाऊंट्सचा वापर स्कॅम आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला जात होता. मेटाने व्हॉट्सऍपची सुरक्षा ध्यानात ठेवून हिंदुस्थानातील 84.5 लाख अकाऊंट बंद केली आहेत. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यादरम्यान जवळपास 16.6 लाख अकाऊंट्सला ब्लॉक करण्यात आले आहे.
बंदीचे प्रमुख कारण
बल्क मेसेज पाठवणे, स्पॅमिंग, आर्थिक फसवणुकीत सहभागी असणे, चुकीची माहिती शेअर करणे, स्थानिक कायद्याचे उल्लंघन करणे, लैंगिक अत्याचारसंबंधी मजकूर प्रसारित करणे यासारखी कामे केली जात होती.