Mental Health- मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय करायला हवं?

सध्याच्या धावपळीच्या जगात माणसाने केवळ शारीरिक नाही तर, मानसिकदृष्ट्याही मजबूत असणं गरजेचं आहे. मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता, उपाय शोधण्याचे कौशल्य आणि व्यावहारिक विचारसरणी या सर्वात अग्रेसर असते. आजकाल, ताणतणाव आपल्या जीवनाचा एक मोठा भाग बनला आहे, अशा परिस्थितीत आपण मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे हे खूप महत्वाचे आहे.

मानसिकदृष्ट्या निरोगी असण्याचे फायदे

 

मानसिकदृष्ट्या निरोगी राहिल्यामुळे काम करण्याचा वेग वाढतो, तसेच रोजच्या जीवनात ताण तणाव येत नाही.

 

भावनिक दृष्ट्या स्थिर असणारी माणसं ही मानसिकदृष्ट्या निरोगी असतात. त्यामुळेच अशा व्यक्ती तणाव, चिंता आणि नैराश्य यापासून दूर राहतात.

 

आपण मानसिकदृष्ट्या निरोगी असू तर, आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. तसेच संसर्गजन्य आजारांवर आपण निकराने मात करू शकतो.

 

निरोगी मनामुळे शारीरिक आरोग्य सुधारते आणि रोगांशी लढण्याची क्षमता देखील वाढते.

 

मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती सामाजिक आणि आर्थिक बाबींमध्ये योग्य निर्णय घेण्यास सक्षम असते.

 

 

 

 

मानसिकदृष्ट्या निरोगी कसे राहावे?

पौष्टिक आहार मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतो. मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी, तुमच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फळे आणि भाज्यांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

 

शारीरिक हालचाली अधिक प्रमाणात करायला हव्यात. त्यामुळे मेंदूमध्ये एंडोर्फिन हार्मोन्सचे प्रकाशन होते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

 

मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी नवीन उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. नवीन गोष्टी शिका, जसे की नवीन छंद जोपासणे. यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

 

 

दिनचर्येत व्यायाम, योग आणि ध्यान यांचा समावेश करून तुम्ही ताण कमी करू शकता आणि भावनिक संतुलन राखू शकता.

 

मित्र आणि कुटुंबाशी नातेसंबंध उत्तम राखल्याने तसेच सकारात्मक संवाद साधल्याने मानसिक आरोग्य सुधारू शकते.

 

दररोज ७ ते ८ तास पुरेशी विश्रांती घ्या आणि झोप घ्या. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी झोप खूप महत्वाची आहे.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)