
बेल्स पाल्सी हा आजार विषाणूच्या संसर्गामुळे होतो. हा विषाणू हवेतून किंवा खाण्यापिण्यातूनही शरीरात जाऊ शकतो. या आजारात चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होतात. म्हणजेच एका बाजूच्या स्नायूंमध्ये अंशतः पक्षाघात होतो, अशी माहिती कन्सल्टिंग ईएनटी सर्जन डॉक्टर अभय देशपांडे यांनी दिली.
या आजारात चेहऱ्याच्या एका बाजूला कुठल्याही प्रकारची हालचाल करताना त्रास जाणवतो. त्या भागाची हालचाल मंदावते. आणि तोंड थोडे वाकडे होते. खाताना-पिताना आणि हसताना त्रास जाणवतो. हा आजार प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. या आजारवर औषधोपचार आहेत. योग्य उपचार घेऊन साधारण तीन ते चार आठवडय़ांत कुठलाही रुग्ण बरा होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हॉलिवूड गायक जस्टीन बिबर, अभिनेते अनुपम खेर, सिल्वेस्टर स्टेलॉन यांना हा आजार झाला होता.